ji24news

बळी राजा वर्षानी सुखावला ..!

 जोहार इंडिया 24 न्यूज . इन ./पालघर जिल्हा प्रतिनिधि :रामदास गाडर .

पालघर जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला असून प्रचंड उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनाही सुखद गारवा अनुभव  आला . 

सोमवारी सकाळपासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. परिणामी नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर, सफाळे, वसई-विरार शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस बरसत आहे. जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. भातशेतीची कामे खोळंबली होती. शिवाय पाणीटंचाईचे सावट देखील जिल्ह्यात होते; परंतु मान्सून सक्रिय झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.
पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन कक्ष सज्ज झाला आहे. दुर्घटना घडू नये, पावसाचे पाणी साचून जनजीवन विस्कळित झाल्यास नागरिकांचे स्थलांतर करता यावे यासाठी यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. दरम्यान, वीज अंगावर पडून सावरे ग्रामपंचायत हद्दीत ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी विजेपासून सावध राहण्याचा इशारा पालघर जिल्हा प्रशासनाने दिला आहे. वीज कोसळून जीवितहानी होऊ नये याकरिता केंद्र सरकारने निर्मित केलेल्या ‘दामिनी ॲप’चा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर