
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ) विक्रमगड, ता. २१ .
जव्हार- मोखाडा- विक्रमगड सर्वसाधारण मतदार संघातून विक्रमगडचे प्रशांत भालचंद्र नडगे (एकूण ३९२ मते) व मोखाड्याचे हेमंत बाळकृष्ण लहामगे (एकूण ५१७ मते) बहुमताने निवडून आले.
ही निवडणूक ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत होती. आतापर्यंत विक्रमगड तालुक्यातील एकाही उमेदवाराला संचालक पदाची निवडणूक जिंकता आली नव्हती.
या निवडणुकीमध्ये १० उमेदवार रिंगणात होते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा असा मतदारसंघ असल्याने सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात मते मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रयत्नाची शर्थ लागली होती. या मध्ये हेमंत लहामगे व प्रशांत नडगे यांच्या युतीने पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून विजयी पताका फडकावली. विक्रमगड तालुक्याला पहिल्यांदाच संचालक पद मिळाल्याबद्दल प्रशांत नडगे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते….
रवी बुधर ३४६.
राजाभाऊ चव्हाण ३५
साईनाथ डोके ३८
प्रकाश डोले ३३७
हेमंत लहामगे ५१७ (विजयी)
प्रशांत नडगे ३९२ (विजयी)
परशुराम माळी २४
विकास पालवे १०९
संतोष पाटील ३३०
किरण सातवी ४०
विक्रमगड येथील विजयी उमेदवार प्रशांत नडगे
मोखाड्यातील विजयी उमेदवार हेमंत बाळकृष्ण लहामगे.
Total Users : 10829