ji24news

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढण्यास सुरुवात ..!

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ).

मुंबईत मागील सात दिवसांत तर कोरोना रुग्णांमध्ये 53.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील आकडेवारीनुसार राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 15 मेपासून कोरोनाच्या संसर्गाचा आलेख झपाटय़ाने वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 11 मे रोजी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 255 होती. त्यानंतर जून महिन्यात कोरोनाचा झपाटय़ाने फैलाव होण्यास सुरुवात झाली. 1 जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या थेट एक हजारावर गेली. त्यानंतर पुढील काही दिवसांत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली. त्यानंतर 15 ते 19 जून या काळात तर दररोजच्या रुग्णांची संख्या चार हजारांवर गेली. 21 जून रोजी 3 हजार 659 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
राज्यातील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला चार हजार रुग्ण आढळत आहेत . त्यामुळे मास्क घालणे , आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे .
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात पुणे, रायगड, ठाणे व मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याबद्दल आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली
सात दिवसांत सर्वाधिक वाढ.
मागील सात दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाल्यासारखी वाढ झाली आहे.

मुंबईत 53.70 टक्के, ठाणे 23 टक्के, पुणे 8.94 टक्के, रायगड 5.43 टक्के, इतर जिह्यांत 5.59 टक्क्यांनी रुग्णवाढ झाली आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर

मुंबई – 16.12 टक्के

पालघर – 15.87 टक्के

ठाणे – 14. 94 टक्के

पुणे – 13.87 टक्के

राज्य – 10. 64 टक्के

राज्याच्या सरासरी पॉझिटिव्हीटी दरापेक्षा मुंबई, पालघर, ठाणे व पुण्याचा अधिक

एकूण सक्रिय रुग्ण 24 हजार 613

रुग्णालयातले रुग्ण 1 हजार 141

गंभीर रुग्ण 274

आयसीयूमधले रुग्ण 153

व्हेंटिलेटरवरील रुग्ण 22

ऑक्सिजनवरील रुग्ण 131

मुंबईत सक्रिय रुग्णसंख्या 20 हजारांच्या घरात; दिवसभरात 1648 रुग्ण, दोघांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाची गेल्या दहा दिवसांत फक्त एक दिवस कमी झालेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून आज पुन्हा एकदा 1648 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 19 हजार 588 वर पोहोचली आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 8 हजार 131 चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यातील 91 बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 17 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. नव्या रुग्णांमुळे मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 99 हजार 383 झाली आहे. तर एकाच दिवसात 2291 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या 10 लाख 66 हजार 294 वर पोहोचली आहे.
मुंबईची सद्यस्थिती
मुंबईत सध्या रुग्णवाढीचे प्रमाण आता 0.183 टक्क्यांवर गेले आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर गेले आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढीमुळे रुग्णदुपटीचा कालावधी 371 दिवसांवर खाली आला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे निर्बंध नसले तरी नागरिकांनी कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर