ji24news

कोकण सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांचा नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात:, नाबाद १०० व्याख्यान…!

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

कोकण सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांचा नि:शुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात: नाबाद १००.

         महाराष्ट्रातील व प्रामुख्याने कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे कसे वळतील, शासकीय नोकरी मधील त्यांची टक्केवारी कशाप्रकारे वाढेल, ग्रामीण भागातील व गोरगरीब विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन कशाप्रकारे प्राप्त होईल, कोकण बोर्ड सलग अव्वल स्थानावर येतो परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये तेवढे झळकत नाहीत याचा संशोधनात्मक विचार करून शासकीय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचा झंझावात करणारे मूळ सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावचे व मुंबईत वास्तव्यास असणारे, सिंधू तसेच कोकण सुपुत्र, माननीय श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार (JHT EXAM 2017, AIR 166) यांनी “न भूतो न भविष्यती” स्वरूपात व्याख्यानांचे शतक साजरे केलेले आहे. शून्यातून शिखर गाठणारे, प्रेरणादायी व्याख्याते व शासकीय अधिकारी, आपल्या कोकणाशी तसेच महाराष्ट्र शी असलेली मातीची नाळ कायम ठेवत व स्वतः अधिकारी झालो तरी समाजाचे देणे फेडण्यासाठी, केवळ वक्तव्य न करता प्रत्यक्ष कृतीद्वारे ऑफलाईन व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण कोकणामध्ये “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने ज्ञानगंगा आणली आहे. सर्व व्याख्याने नि:शुल्क असून माननीय रेडकर सर एकही रुपया मानधन किंवा प्रवास भत्ता घेत नाहीत.

रविवार, दिनांक १९ जून २०२२ रोजी बालक मंदिर संस्था कल्याण, गिरगाव माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गिरगांव, ता. तलासरी, जि. पालघर येथे जवळपास विक्रमी ४०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे १००वे निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान पार पडले. पावसाचा व्यत्यय आला तरी भर पावसात विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक व्याख्यानाचा तसेच मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आगामी शतकोत्तर व्याख्याने दिनांक २५ तसेच २६ जून २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कुडाळ व कणकवली तालुक्यात आयोजित केली गेली आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर